Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मटन सूप, प्रियकर आणि हत्येचा उलगाडा

मटन सूप, प्रियकर आणि हत्येचा उलगाडा
, बुधवार, 13 डिसेंबर 2017 (16:44 IST)
एखादी अनपेक्षित गोष्ट सुद्धा अनेकदा नवीन गोष्टी उलगडू शकते याचाच प्रत्येय आला आहे. एक मटन सूप मुळे पत्नीने प्रियकरासोबत मिळून केलेली पतीची हत्येचा उलगडा झाला आहे. अॅसिड हल्ल्याचा तपास करणा-या पोलिसांना मटण सूपमुळे हे एक हत्या प्रकरण असून खूप मोठा कट रचला गेल्याचं लक्षात आल आहे. हैदराबादमध्ये राहणा-या एम स्वाती हिने आपला प्रियकर राजेशसोबत मिळून आधी आपला पती एम सुधाकर रेड्डी याची हत्या केली. यानंतर आपल्या पतीची ओळख लपवण्यासाठी प्रियकराच्या चेह-यावर अॅसिड फेकल आहे. माझ्या पतीवर हल्ला झाला असून प्रियकर आपला पती आहे असे त्यांनी सर्वाना पटवून दिले आणि ते सर्वाना पटले सुद्धा. जेव्हा तिचा प्रियकर अॅसिड हल्ल्याचा उपचार घेत होता. तेव्हा अनेक नातेवाईक भेटायला येत होते. कुटुंबातील एका सदस्याने त्याला मटण सूप ऑफर केलं. पण राजेश शाकाहारी असल्या कारणाने त्याने सूप पिण्यास नकार दिला. यामुळेच सुधाकर रेड्डीच्या कुटुंबियांना संशय आला, कारण सुधार रेड्डीला मटण सूप प्रचंड आवडत होते. त्यामुळे मोठा खुलासा होणार असे समजून या हॉस्पिटल मध्ये दाखल असलेल्या ढोंगी प्रेमीच्या हाताचे ठसे आणि इतर गोष्टी चेक केल्या गेल्या आणि हा खुनाचा प्रकार पोलिसांना समजला आहे. चौकशीदरम्यान स्वातीने आपण आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केली, आणि नंतर प्रियकर राजेशलाच सुधाकर म्हणून सगळ्यांसमोर आणण्यासाठी त्याच्या चेह-यावर अॅसिड फेकल्याची कबुली दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

विराटच्या बालपणीचे प्रेम आहे अनुष्का