Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

डॉक्टर मोबाईलमध्ये मग्न, महिलेची झाली प्रसृती

डॉक्टर मोबाईलमध्ये मग्न, महिलेची झाली प्रसृती
उत्तर प्रदेशमध्ये  शहाजानपुर जिल्ह्यातील सरकारी इस्पितळात एका महिलेच्या प्रसृतीदरम्यान डॉक्टर मोबाईल पाहण्यात व्यग्र होती. यादरम्यान महिलेने बाळाला जन्म दिला आणि थेट कचर्‍याच्या डब्यात पडला. महिला डॉक्टरांनी लक्ष न दिल्याने बाळ खाली पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यामुळे बाळाला एका खाजगी इस्पितळात दाखल केले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
 
शाहजानपुरातील एका महिलेला प्रसृती कळा सुरू झाल्याने तिला जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात तासानंतर या महिलेला प्रसृतीसाठी प्रसृती विभागात दाखल करण्यात आले. तिथे हजर असलेल्या डॉक्टर तनवी या महिलेवर उपचार करण्याऐवजी मोबाईलवर व्यग्र होत्या. अचानक महिलेने बाळाला जन्म दिला. बाळ खाटेवर पडून खाली कचर्‍याच्या डब्यात पडले. कचर्‍याच्या डब्यात आदळल्याने बाळाच्या चेहर्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या बाळ आणि आईवर एका खाजगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इथे भरवली जाते आळशी लोकांची स्पर्धा!