Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील, एनटीएने केलं स्पष्ट

परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील, एनटीएने केलं स्पष्ट
, शनिवार, 22 ऑगस्ट 2020 (15:38 IST)
राष्ट्रीय सामाईक प्रवेश परीक्षा (जेईई) आणि राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET UG) वेळेतच होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत असतानाच नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (एनटीए) ही माहिती देण्यात आली आहे. एनटीएकडून वेबसाईटवर यासंबंधी अधिकृत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. एनटीएने जेईई मुख्य परीक्षा ठरल्याप्रमाणे १ ते ६ सप्टेंबर दरम्यान होणार असल्याचं सांगितलं आहे.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र एनटीएने परीक्षा ठरल्याप्रमाणेच होतील असं स्पष्ट केलं आहे. 
 
जेईई मुख्य परीक्षेसोबत नीट परीक्षाही वेळेतच होणार आहे. ही परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे. याआधी सर्वोच्च न्यायालयानेही नीट आणि जेईई परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्र्यांच्या घरी गणेशाची प्रतिष्ठापना