Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंतप्रधान मोदी वास्तविक पाहता सरेंडर मोदी -राहुल गांधी

पंतप्रधान मोदी वास्तविक पाहता सरेंडर मोदी -राहुल गांधी
, सोमवार, 22 जून 2020 (07:28 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वास्तविक पाहता ‘सरेंडर मोदी’आहेत, अशी टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. पंतप्रधानांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केल्याचा आरोप त्यांनी आदल्या दिवशी केल्यानंतर रविवारीही त्यांनी टष्ट्वीट करुन ‘सरेंडर मोदी’ असे संबोधले. तसेच एका विदेशी नियतकालिकातील ‘चीनप्रति भारताचे अनुनय धोरण उघड’या शीर्षकाखालील लेख आणि दूरचित्रवाणीवरील बातम्यांची फीतही जोडली आहे.
 
नरेंद्र मोदी हे खऱ्या अर्थाने शरणागत मोदी (सरेंडर मोदी) आहेत. पंतप्रधान म्हणतात की, कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही आणि कोणीही भारताच्या भागावर कब्जा केला नाही, परंतु, उपग्रहामार्फत मिळालेल्या छायाचित्रानुसार चीनने लडामधील पँगॉग त्सो सरोवरानजीक भारताच्या पवित्र भूमीवर कब्जा केल्याचे स्पष्ट दिसते, असे राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. तसेच याच्या पुष्ठ्यर्थ राहुल गांधी यांनी सोबत एका वृत्त वाहिनीवरील बातम्यांची फित जोडली आहे.
 
भारत-चीन तणावावर चर्चा करण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते की, कोणीही भारतीय हद्दीत घुसखोरी केली नाही, तसेच कोणीही आमच्या चौकीवर कब्जा केलेला नाही. त्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी असा आरोप केला होता की, चीनच्या आक्रमतेपुढे पंतप्रधानांनी भारतीय भूभाग चीनच्या हवाली केला. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने प्रत्यक्ष ताबा रेषेसंबंधी पंतप्रधानांनी केलेल्या विधानाबाबत स्पष्टीकरण देतांना म्हटले की, त्यांच्या विधानाचा विपर्यास्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या टीकेनंतर भाजपने त्यांच्यावर टीका केली आहे. देशाच्या पंतप्रधानांवर अशा प्रकारची टीका शोभत नाही, असे पक्षाने म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज ग्रहण : विठ्ठल- रुक्मिणीच्या नित्योपचारात बदल