टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेले सायरस मिस्त्री शनी यांनी शिंगणापूरला शनी देवाचे दर्शन घेतले आहे.सोबतच त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचेही दर्शन घेतले. टाटा गृपच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दर्शन घेतल्याचे बोलले जात आहे. यावेळी त्यांनी साडेसातीतून सुटकेसाठी शनीला साकडे घातल्याचेही समजते.