Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

Sam Pitroda
, बुधवार, 8 मे 2024 (21:36 IST)
सॅम पित्रोदा यांनी इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरवर लिहिले की, 'सॅम पित्रोदा यांनी स्वत:च्या इच्छेने इंडियन ओव्हरसीज काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्षांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

याआधी काँग्रेस नेते सॅम पित्रोदा त्यांच्या वक्तव्यामुळे बुधवारी वाद निर्माण झाला होता. ते म्हणाले होते की, देशाच्या पूर्व भागातील लोक चिनी आणि दक्षिण भारतीय आफ्रिकन नागरिकांसारखे दिसतात.आपण गेल्या 75 वर्षांपासून सुखात राहत आहोत. काही जिथे काही मारामारी वगळता लोक एकत्र राहू शकतात. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशाला आपण एकत्र ठेऊ शकतो.  पूर्वेकडील लोक चिनी लोकांसारखे, पश्चिमेकडील लोक अरबांसारखे, उत्तरेकडील लोक गोरे आणि दक्षिण भारतीय आफ्रिकनसारखे दिसतात.तरीही त्याचा आपल्या जगण्यावर काहीही परिणाम झालेला नाहीत्यांच्या या वक्तव्यामुळे गदारोळ  झाला होता.

काँग्रेसने त्यांच्या या वक्तव्यापासून स्वतःला दूर केले होते, काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले होते की, सॅम पित्रोदा यांनी भारताच्या विविधतेशी दिलेली उपमा चुकीची आणि अस्वीकार्य आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्वतःला या सादृश्यांपासून पूर्णपणे अलिप्त करते.

या वर चांगलाच विरोध झाला असून पंतप्रधान मोदी काँग्रेसला लक्ष्य करत म्हणाले विरोधक जेव्हा मला शिवीगाळ करतात तेव्हा मी सहन करू शाळतो. परंतु माझ्या देशातील जनतेला काहीही म्हटलेलं मला चालणार नाही. ते मी सहन करू शकणार नाही. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून आपण त्याची गुणवत्ता ठरवू शकत नाही. मला पित्रादाच्या विधानाचा राग आला असून संविधानाच्या रक्षणाची गोष्ट करणारे जनतेच्या रंगावरून त्यांचा अपमान करत आहे. 

Edited by - Priya Dixit 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Nashik : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची दोन मुलींसह आत्महत्या