कोलकत्याच्या आरजी कार रुग्णालयातील ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार आणि तिची निघूनहत्या केल्या प्रकरणी आरोपी संजय रॉयला अटक केली आहे.तो सध्या कोलकाता येथील प्रेसिडेन्सी सुधारगृहाच्या कोठडीत आहे. त्याने तुरुंगातील भाजी पोळी खाण्यास नकार दिला आहे. त्याने भाजी पोळी ऐवजी अंडाचाऊमीन ची मागणी केली आहे. त्याला तुरुंगातील जेवण आवडत नाही.
तुरुंगाच्या नियमानुसार, सर्व कैद्यांना एक सारखे जेवण दिले जाते. काही प्रकरणांमध्ये घरातून जेवण मागवण्याची परवानगी दिली जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दररोज भाजी पोळी खाऊन त्याला कंटाळा आला असून त्याने भाजी पोळी खाण्यास नकार दिला आहे. त्याने खाण्यासाठी अंडा चाऊमीन खाण्याची मागणी केली आहे. त्याच्या मागणीला फेटाळत तुरुंग कर्मचाऱ्यांनी त्याला खडसावले आहे.