Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजमेर सियालदाह एक्सप्रेसचे १४ डबे घसरून २ प्रवासी ठार

अजमेर सियालदाह एक्सप्रेसचे १४ डबे घसरून २ प्रवासी ठार
, बुधवार, 28 डिसेंबर 2016 (10:39 IST)
कानपूरजवळ अजमेर सियालदाह एक्सप्रेसचे १४ डबे घसरून २ प्रवासी ठार, तर अनेकजण जखमी झाल्याचे समजते. ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास कानपूरपासून ७० किलोमीटर अंतरावर रुरा रेल्वेस्थानकाजवळ एक कोरडा कॅनॉल ओलांडताना ही दुर्घटना घडली. याघटने मागील कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

ही गाडी सियालदाहवरून अजमेरला चालली होती. या गाडीचा क्रमांक 12987 असून सहाव्या बोगीपासून ते २०व्या बोगीपर्यंतचे डबे रुळावरून घसरल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू झाले असून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आल्याची माहिती येथील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहितांच्या घरी आयकर विभागाच्या धाडी