Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नेकटाईच्या झुल्यात अडकून 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू

child death
, मंगळवार, 31 डिसेंबर 2024 (21:22 IST)
Vadodara News: वडोदरा येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्री वडोदरातील नवापुरा भागात घडली. येथे राहणारा मुलगा आपल्या घरी झुल्यावर स्टंट करत असताना त्याची नेकटाई झुल्याच्या फासात अडकली. टाय अडकल्याने त्याचा गळा आवळला गेला व मृत्यू झाला.
 
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडली तेव्हा मुलाची आई शेजाऱ्यांच्या घरी एका कार्यक्रमासाठी गेली होती. वडील दुसऱ्या खोलीत होते. नवापुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक म्हणाले, “मुलाला झुल्यावरील स्टंटबाजीचे व्यसन होते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. तथापि, त्याने नेकटाई घातली होती, जी स्विंगच्या लूपमध्ये अडकली आणि तो लटकला. त्याच्या वडिलांनी त्याला बेशुद्धावस्थेत पाहिले व रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यापूर्वी पोस्टमोर्टमसाठी पाठवला.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Santosh Deshmukh murder पोलिसांना अपयश म्हणत काँग्रेसने मुख्यमंत्री फडणवीसांकडे राजीनामा मागितला