Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिला मतदान कर्मचारीचा मृत्यू, रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला मृतदेह

accident
, बुधवार, 8 मे 2024 (14:44 IST)
देशात सध्या लोकसभा निवडणूक सुरु आहे. सर्व मतदान कर्मचारी काम करीत आहे. अशीच एक घटना छत्तीसगड मधून समोर आली आहे. मशीनला स्ट्रॉंग रूममध्ये जमा करून परतत असताना महिला एका अपघाताची शिकार झाली हा अपघात एवढा भयंकर होता की, पाहणारे लोक सुन्न झालेत तसेच महिलेला रुग्णालयात नेत असतानांच तिचा मृत्यू झाला. 
 
छत्तीसगड मध्ये मोठी घटना घडली आहे. यामध्ये महिला मतदान कर्मचारीच मृत्यू झाला आहे. संध्याकाळी 6 वाजता मतदान संपल्यानंतर ही महिला EVM मशीन स्ट्रॉंग रूममध्ये जमा करायला गेली होती. नंतर परतत असतांना या महिलेचा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार ही महिला स्कुटीवर होती आणि मागून जलद गतीने येणाऱ्या वाहनाने तिला धडक देऊन चिरडून टाकले. हा अपघात एवढा भयंकर होता की, क्षणात रस्ता रक्ताने भरून गेला. या महिलेला लागलीच रुग्णालयात नेण्यात आले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी या अज्ञात वाहनाविरुद्ध केस नोंदवली आहे.  

Edited By- Dhanashri Naik   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वोटिंग पर्सेंटेज वाढवण्यासाठी मुंबई मेट्रोचा पुढाकार, निवडणूक दरम्यान प्रवाशांना मिळेल ही सूट