Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आनंदाची बातमी- आता रेशन कार्डाशी संबंधित या मोठ्या सेवा ऑनलाईन मिळत आहेत, जाणून घ्या काय करावे?

आनंदाची बातमी- आता रेशन कार्डाशी संबंधित या मोठ्या सेवा ऑनलाईन मिळत आहेत, जाणून घ्या काय करावे?
, शनिवार, 18 सप्टेंबर 2021 (14:58 IST)
रेशन कार्डद्वारेच सरकार त्यांच्या राज्यात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना रेशन पुरवते. गरीब व्यक्तीला रेशन कार्डाद्वारेच रेशन दिले जाते. तथापि, बऱ्याच वेळा असे देखील घडते की रेशन कार्ड अपडेट करताना किंवा त्याची डुप्लिकेट कॉपी मिळवण्यासाठी किंवा नवीन रेशन कार्डासाठी अर्ज करण्याचा संदर्भात आपल्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.अशा समस्येला सामोरी जावे लागू नये आणि सर्वाना रेशन मिळावे या साठी सरकार आपल्या डिजिटल इंडिया मोहिमे अंतर्गत या समस्येवर समाधान देत आहे.

आता आपण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) ला भेट देऊन रेशन कार्ड संबंधित सेवेला ऍक्सेस करू शकता.डिजिटल इंडियाने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.
 
डिजिटल इंडिया ने काय म्हटले ते जाणून घ्या? डिजिटल इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर म्हटले आहे की, 'कॉमन सर्व्हिस सेंटर सुविधा यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागासोबत सामंजस्य करार केला आहे. या मुळे देशभरात 3.70 लाख CSC द्वारे रेशन कार्ड सेवा उपलब्ध करून दिली जाईल. या भागीदारीमुळे देशभरातील 23.64 कोटीपेक्षा जास्त रेशन कार्ड धारकांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.
 
जाणून घ्या कोणत्या सेवा उपलब्ध असतील 1. रेशन कार्डचे तपशील कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे अपडेट केले जाऊ शकतात. 
2 याद्वारे आपण आधार अपडेट करू शकता.
3 आपण आपल्या रेशनकार्डाची प्रत देखील काढू शकता.
4 रेशनच्या उपलब्धतेची माहिती मिळवू शकता.
5  आपण कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे रेशन कार्डाशी संबंधित तक्रारी देखील करू शकता.
6  रेशन कार्ड गहाळ झाले असल्यास तर नवीन रेशनकार्डसाठी देखील अर्ज करता येईल.
 
रेशन कार्डासाठी कोण अर्ज करू शकतात - भारताचे नागरिकत्व असलेल्या देशातील प्रत्येक नागरिक रेशन कार्डासाठी अर्ज करू शकतो. 18 वर्षांखालील मुलाचे नाव पालकांच्या रेशन कार्डात जोडले जाते. दुसरीकडे, जर आपले वय 18 वर्षांपेक्षा जास्त असेल तरआपण  स्वतंत्र रेशन कार्डासाठी अर्ज करू शकता.
 
उत्पन्नाच्या आधारावर रेशन कार्ड बनवले जातात - साधारणपणे तीन प्रकारचे रेशन कार्ड बनवले जातात. दारिद्र्य रेषेच्या वर राहणाऱ्या लोकांसाठी APL, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी BPL आणि सर्वात गरीब कुटुंबांसाठी अंत्योदय. ही श्रेणी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या आधारे ठरवली जाते. या व्यतिरिक्त,वेगवेगळ्या रेशन कार्डवर स्वस्त दरात उपलब्ध असलेल्या गोष्टी,त्यांचे प्रमाण वेग वेगळे असते दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदय योजनेचे रेशन कार्ड मिळवण्यासाठी आपल्याला काही कागदपत्रे सादर करावी लागतात..
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोरोना प्रोटोकॉलसंदर्भात सल्लागार जारी केला