मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात 'कॉलरवाली' आणि पेंचची राणी म्हणून प्रसिद्ध असलेली हा वाघिण सातव्यांदा आई झाली असून तिने चार पिल्लांना जन्म दिला आहे. आतापर्यंत तिने 26 बछड्यांना जन्म दिला आहे. त्यामुळे ती सुपर मॉम ठरली आहे. याशिवाय आतापर्यंत 26 बछड्यांना जन्म देत कॉलरवालीने नवा रेकॉर्ड सुद्धा केला आहे. वन्यजीव तज्ञांनी ही चांगली बातमी असल्याचं सांगितलं आहे. गेल्या काही महिन्यात मध्य प्रदेशात 35 वाघांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही दिलासा देणारी बातमी आहे.