मुझफ्फरनगर- उत्तरप्रदेशात बेकायदेशीर कत्तलखाने बंद झाल्याचा प्रभाव येथील एका लग्नात दिसून आला. वरातीत वर हे बघून अनावर झाला की जेवण्यात केवळ शाकाहारी पदार्थच आहे. ही घटना कुल्हेडी गावात घडली असून जेवण्यात मासाहारी भोजन नसल्यामुळे वरात नाराज झाली.
वधू पक्षाने वर पक्षाला समजवण्याचा प्रयत्न केला की मासाच्या कमी मुळे मासाहारी भोजन ठेवू शकलेलो नाही तरी वाद निर्माण झाला. हा प्रकरणाचा निकाल काढण्यासाठी लगेच पंचायत बैठक झाली ज्यात शेवटी वधूने त्या व्यक्तीसोबत लग्न करायला नकार दिला. परंतू या कहाणीचा शेवट सुखद राहिला कारण लग्नात आलेल्या एका पाहुण्याने वधूला तिथेच लग्नाचा प्रस्ताव मांडला आणि तिनेही तो स्वीकारला. पंचायतनेही हा विवाहाला सहमती दर्शवली.