Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यंदा यूपीएससीच्या जागांमध्ये कपात

यंदा यूपीएससीच्या जागांमध्ये कपात
, सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (15:16 IST)
केंद्रीय लोकसेवा आयोगाने यंदा यूपीएससीच्या जागांमध्ये कपात केली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यावर्षी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS), भारतीय परदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलीस सेवेतील (IPS) रिक्त पदांसाठी केवळ 980 अधिकाऱ्यांची भरती केली जाणार आहे.
 
केंद्रीय लोकसेवा आयोगाने 2016 मध्ये 1079, तर 2015 मध्ये 1164 रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात दिली होती. तर 2014 आणि 2013 मध्ये अनुक्रमे 1364 आणि 1228 अधिकाऱ्यांची भरती केली गेली. याशिवाय 2012 मध्ये यूपीएससी परिक्षेच्या माध्यमातून आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची 1091 जागा रिक्त भरण्यात येणार असल्याचं केंद्रीय लोकसेवा आयोगाने सांगितलं होतं. मात्र 2017 मध्ये यूपीएससी परिक्षेसाठी जो आकडा दिला आहे, त्यानुसार यंदा केवळ 980 जागांसाठीच परिक्षा घेतली जाणार आहे. यातील 27 पदं दिव्यांगांसाठी आरक्षित ठेवण्यात आली आहेत. गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत यंदाची यूपीएससीच्या जागांचा आकडा फारच लहान आहे. चालू वर्षातील 2017 मधील पहिल्या टप्प्यातील परिक्षा 18 जून रोजी घेण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमिताभ बच्चने दिल्या मराठी दिनाच्या ट्विटरवरुन मराठीत शुभेच्छा