यूपीएससीच्या परीक्षेतील परीक्षार्थींचे गुण पहिल्यांदाच ऑनलाईन घोषित केले जाणार आहेत. खासगी क्षेत्रातल्या कंपन्यांनाही या विद्यार्थ्यांची गुणवत्ता समजावी, विद्यार्थ्यांची यूपीएससीत निवड झाली नाही, तरी याच गुणांच्या आधारे त्यांना कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी या हेतूनं हा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारच्या या निर्णायने अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांचा निकाल वेबसाईटवर सार्वजनिक करुन त्याचा डेटाबेस तयार केला, तर खासगी कंपन्यांना हवे असलेले, गुणवान विद्यार्थी शोधण्यास सोपं जाऊ शकेल असं यूपीएससीनं म्हटलेलं आहे. जे विद्यार्थी यूपीएससीच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत (मुलाखतीपर्यंत) पोहचले, पण त्यांची निवड होऊ शकली नाही. अशा विद्यार्थ्यांचे गुण यात जाहीर केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचे गुण, त्यांची शैक्षणिक पात्रता यासंदर्भातले तपशील या डेटाबेसमध्ये उपलब्ध करुन दिले जातील.