Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बारमध्ये रामायण रिमिक्सवर डान्सचा व्हिडिओ झाला व्हायरल

video bar dance
, मंगळवार, 11 एप्रिल 2023 (10:21 IST)
नोएडा. उत्तर प्रदेशातील नोएडा येथील एका डान्सबारमध्ये रामायण रिमिक्सवरील डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणावरुन गदारोळ झाला. या प्रकरणी पोलिसांनी 3 जणांविरुद्ध एफआयआर नोंदवून 2 जणांना अटक केली आहे.
  
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 13 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये काही लोक दारूच्या पार्टीत रामायणाच्या रिमिक्सवर नाचताना दिसत आहेत. मागे टीव्हीवर रामायणातील राम रावणाच्या युद्धाचे दृश्यही दिसते.
 
अतिरिक्त पोलिस उपायुक्त (नोएडा) शक्ती मोहन अवस्थी यांनी सांगितले की, सोमवारी सकाळी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि तो गार्डन गॅलेरिया मॉलमधील 'लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स रेस्टो-बार'चा असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेत सेक्टर 39 पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बारचे मालक मीनाक कुमार आणि व्यवस्थापक अभिषेक सोनी यांना अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डीजे ऑपरेटर फरार असून त्याचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
पोलिसांनी सांगितले की भारतीय दंड संहितेच्या कलम 153A (सद्भावनेला प्रतिकूल कृत्य करणे किंवा सार्वजनिक शांतता बिघडवण्याची शक्यता असलेले कृत्य) आणि 295 (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या हेतूने प्रार्थनास्थळाचे नुकसान करणे किंवा अपवित्र करणे) अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे. .

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

North East Express: चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशाने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या