Golden Chariot सध्या देशातील अनेक सागरी भागात आसनी चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येत आहे. बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेले चक्रीवादळ आता आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. दरम्यान आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम भागात वादळामुळे समुद्रात उसळलेल्या लाटांमध्ये सोन्याचा रथ वाहून आला आहे. हा रथ कुठून आला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
आंध्र प्रदेशातील सुन्नापल्ली येथे सोन्याचा रथ रहस्यमयरीत्या समुद्रात वाहून आल्याने मच्छिमारांनी ते पकडले आहे. रथ पाहताच मच्छिमारांनी रथ पकडून समुद्राच्या किनाऱ्यावर आणला, त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. या रथात 16 जानेवारी 2022 ही तारीख घातलेली दिसून येत आहे. हा रथ नेमका कुठून आला हे अधिकाऱ्यांसाठी गूढच आहे. काही लोक श्रद्धेचे केंद्र मानून जय जयकरेचा नाराही लावत आहेत. हा रथ इथपर्यंत म्यानमार, मलेशिया किंवा थायलंडमधून वाहून आल्याचे बोलले जात आहे.
हा रथ आला कुठून? यावर काही लोक याला श्रद्धेशी जोडत आहेत, तर काहीजण हे हेरगिरी आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सावधगिरी बाळगायला हवेत, असे सांगत आहेत.