साहित्य : 250 ग्रॅम शिंगाडे, 1 मोठा चमचा तेल, 1 लहान चमचा जिरं, 1 चिमूटभर हिंग, 1/2 चमचा धने पूड, तिखट 1/2 चमचा, 2 हिरव्या मिरच्या कापलेल्या, 1 लहान चमचा लिंबाचा रस, 1 चमचा चाट मसाला, मीठ अंदाजे, कोथिंबीर.
कृती : सर्वप्रथम शिंगाडेचे सालं काढून त्यांना वाफवून घ्यावे. नंतर त्याचे लहान लहान काप करावे. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिंग, हिरव्या मिरच्यांची फोडणी देऊन त्यात शिंगाडेचे तुकडे घालावे. मीठ, तिखट, धने पूड घालून 2 मिनिट झाकण ठेवावे. सर्व्ह करताना लिंबाचा रस, चाट मसाला, कोथिंबीर घालून द्यावे.