भारताची स्टार नेमबाज मनू भाकरचे पदक हुकले आहे. महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात ती चौथ्या स्थानावर राहिली. या स्पर्धेत एकूण 10 शॉट्स मारण्यात येणार होते. एका मालिकेत एकूण पाच शॉट्स होते. तीन मालिकांनंतर एलिमिनेशनची फेरी सुरू झाली.
मनू भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात पदक मिळवण्याचे ध्येय ठेवत होती. या ऑलिम्पिकमध्ये तिने यापूर्वी दोन कांस्यपदके जिंकली आहेत. मात्र, तिचे एक पदक हुकले आणि ती चौथ्या स्थानावर राहिली.
सात मालिकांनंतर ती दुसऱ्या स्थानावर आहे. कोरियन खेळाडू तिच्या पुढे आहे.
पॅरिस ऑलिंपिक 2024 मधील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात भारताच्या मनू भाकरचे पदक थोडक्यात हुकले, जिथे ती चौथ्या स्थानावर राहिली.
2 ऑगस्ट रोजी झालेल्या या स्पर्धेच्या पात्रता फेरीत मनूने दुसरे स्थान पटकावले.
महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात मनू भाकर चौथ्या स्थानावर राहिली. आठ मालिकेनंतर मनू आणि हंगेरीच्या वेरोनिका मेजरचे 28-28 गुण समान होते. अशा परिस्थितीत एलिमिनेशनसाठी शूटऑफ झाला, ज्यामध्ये मनूला पराभवाचा सामना करावा लागला.