पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी मुलाच्या आई, वडील आणि आजोबाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आज मुलाची आई आणि वडिलांना पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असून मुलाच्या आई-वडिलांच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
आरोपी मुलाच्या रक्त चाचणीत फेरफार केल्याबद्दल त्यांना कोठडीत वाढ झाली आहे. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यावर हा निर्णय देण्यात आला आहे. त्यांना 5 जून पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्याचा निर्णय पुणे सत्र न्यायालयाने दिला आहे. आता पोलिसांना आरोपींची चौकशी करण्यासाठी अधिक वेळ मिळू शकेल.
या कार अपघातात पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलाच्या वडिलांना अटक केली होती. नंतर शनिवार 1 जून रोजी पोलिसांनी मुलाच्या आईला अटक केली होती. त्यांच्यावर रक्त नमुन्यात फेरफार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आज दोघांना न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. पोलीस आता अपघात प्रकरणात दोघांची चौकशी करू शकतील.