Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तीन शिवप्रेमींच्या अपघात,गाडी 200 फूट दरीत कोसळली

तीन शिवप्रेमींच्या अपघात,गाडी 200 फूट दरीत कोसळली
, शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (13:23 IST)
गेल्या अडीच वर्षा पासून कोरोनाचे सावट असल्यामुळे कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जात नव्हते. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने राज्यात आज शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. शिवभक्त आज जल्लोषात आपल्या लाडक्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोहळा साजरा करत आहे. जेव्हा राज्यात आनंदाचे वातावरण आहे त्यात शिव जन्मोत्सवासाठी भोर येथून रायगडाकडे शिवज्योत आणण्यासाठी मोटर सायकल वर निघेल्या तीन शिवभक्तांचा अपघातात  झाल्याची बातमी समोर आली आहे. हे तिघे एकाच गाडीवर होते. गाडीचा नियंत्रण सुटून गाडी घसरून 200 फूट दरीत कोसळली. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भोर येथून शिवज्योत आणण्यासाठी रायगडच्या दिशेने मोटर सायकलवर निघालेल्या तीन शिवभक्तांचा सकाळी 3:30 च्या सुमारास वरंध घाटात कावळे किल्ल्याजवळ मोटर सायकली वरील ताबा सुटल्याने अपघात झाला. केतन देसाई(23), किरण सूर्यवंशी(20)आणि प्रथमेश गरुड (25) असे या अपघातात जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमी झालेल्या या तरुणांना महाडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघातात त्यांची मोटारसायकल 200 फूट दरीत जाऊन कोसळली. सुदैवाने त्यांचा जीव वाचला. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नारायण राणे यांचा शिवसेना खासदारांवर घणाघाती हल्ला