Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्च पर्यंत कामावर रुजू होण्याचा अजित पवार यांचा इशारा

एसटी कर्मचाऱ्यांना 31 मार्च पर्यंत कामावर रुजू होण्याचा अजित पवार यांचा इशारा
, शनिवार, 26 मार्च 2022 (14:49 IST)
एसटी कर्मचाऱ्यांनी गेल्या काही महिन्यापासून संप पुकारला आहे. वेतनवाढ आणि एसटी महामंडळाचे राज्यात विलीनीकरण व्हावे अशा काही मागण्या या कर्मचाऱ्यांनी केल्या आहेत. एसटी महामंडळाचे राज्यात विलीनीकरण होणे अशक्य आहे.
 
 राज्यात सध्या परीक्षा सुरु आहे. एसटी संपामुळे  नागरिकांची आणि सध्या परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर येण्याचे आवाहन केले आहे. तरी ही कर्मचारी संपावर आहे. 
 
आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात मीडियाशी संवाद साधताना एसटीच्या कामगारांना 31  मार्च पर्यंत कामावर रुजू राहण्याची डेड लाईन दिली आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहे. काही विद्यार्थी ग्रामीण भागातून येतात त्यांना परीक्षा केंद्रा वर पोहोचण्यासाठी दुसऱ्या वाहनांचा उपयोग करावा लागतो जे त्यांना परवडणारे नसतात. 

त्यामुळे एसटीच्या कामगारांना मी विनंती करतो की त्यांनी कामावर रुजू व्हावं आणि ज्यांना निलंबित केले आहे त्यांना देखील कामावर रुजू होण्याची संधी देत आहे. येत्या 31 मार्च पर्यंत कामगारांनी कामावर रुजू व्हावं. जे येणार नाही त्यांच्याबद्दल कठोर कारवाई करण्यात येण्याचं अजित पवार यांनी सांगितले. 
 
एसटी कामगारांना ही शेवटची संधी आहे. कामगारांच्या वेतनमान देखील वाढवला गेला आहे. आता कामगारांनी आपापल्या कामावर रुजू राहण्याचे आवाहन केले आहे. कामगार 31 मार्च पर्यंत रुजू झाले नाहीत तर त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वयंपाक करताना गॅस संपणार तर नाही, या टिप्सने सिलिंडरमधील शिल्लक गॅस तपासा