इयत्ता अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी शुक्रवारी जाहीर करण्यात आली.या प्रवेश प्रक्रियेमध्ये तब्बल 38 हजार 858 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.संबंधित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने 30 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजे पर्यंत प्रवेश निश्चित करावे लागणार आहे.
या यादी मध्ये सर्वाधिक विध्यार्थी विज्ञान शाखेतून 19 हजार 153 ,वाणिज्य शाखेतून 15 हजार 250 विद्यार्थी,कला शाखेत 3 हजार 834 तर व्होकेशनल शाखेत 621 विध्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहे.महाराष्ट्र बोर्डाच्या 33 हजार 197 विद्यार्थ्यांना प्रवेश अलॉट केले आहे.
पिंपरी चिंचवड आणि पुणे परिसरात केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची पहिली फेरी राबविली जाणार.पुणे विभागातून 311 कनिष्ठ महाविद्यालयात 1 लाख 11 हजार 205 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया होत आहे.पहिल्या फेरीत 56 हजार 767 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते त्या पैकी 38 हजार 858 विद्यार्थ्यांना महाविद्यालय अलॉट केले आहे.
विद्यार्थ्यांना 30 ऑगस्ट रोजी सायंकाळ 5 वाजे पर्यंत प्रवेश देण्यात येणार आहे.अकरावी साठीची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.विद्यार्थ्यांना आपली कागद पत्रे कॉलेज लॉगीनमध्ये जाऊन अपलोड करता येतील. आणि बघता देखील येतील.या मुळे कॉलेजात जाऊन कोणीही गर्दी करू नये असे सांगण्यात आले आहे.'पेमेंट गेट वे 'ने भरावे लागणार.अकरावी प्रवेश समितीनुसार,जर एकाद्या विद्यार्थ्याकडे नॉन क्रिमिलियर प्रमाण पत्र नाही त्यांनी कागद पत्रांसह क्रिमिलियर प्रमाणपत्र साठीचा दिलेला अर्ज सादर करावा.यासाठी त्यांना 21 दिवसांची मुदत दिली जाईल.प्रवेश प्रक्रियेसाठी हे प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे आहे.अन्यथा प्रवेश रद्द करण्यात येईल.
प्रवेश प्रक्रियेत इतर माध्यमांमध्ये सीबीएसई चे 4 हजार 33 आयसीएसई चे 1 हजार 406,आयजीसीएसइ चे 27 नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ओपनींग स्कूलिंग चे 79 इतर माध्यमांचे 112 विध्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे.कला शाखेतून 2 हजार 456 ,वाणिज्य शाखेतून 8 हजार 570 ,विज्ञान शाखेतून 22 हजार 665 जणांना प्रवेश जाहीर केले आहे.प्रवेश 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजे पर्यंतच देण्यात येईल.