एकेकाळी कोरोनाचा सर्वात मोठा हॉट्सपॉट ठरलेल्या पुणे शहरात मागील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला पाहायला मिळतोय. पुणेकरांसाठी दिलासादायक अशी माहिती समोर आली आहे.
पुणे शहरात गेल्या सहा दिवसात कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. तसेच आजही दिवसभरात शहरात एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. तर शहरात मागील 24 तासांत फक्त 41 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. पुण्यात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 686 इतकी आहे.
ह्या आकडेवारीमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळालाय. ह्या आकडेवारीमुळे पुण्यातील प्रशासन व्यवस्था आता कोरोना निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणणार का हे पाहणं गरजेचं आहे. दरम्यान जोवर प्रशासनाकडून नियमांमध्ये शिथिलता येत नाही तोवर सर्व नियमांचे पालन करणे गरजेचे व बंधनकारक आहे.