Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साक्षीदाराने डॉ. दाभोलकरांच्या हत्याऱ्यांना ओळखले

साक्षीदाराने डॉ. दाभोलकरांच्या हत्याऱ्यांना ओळखले
, सोमवार, 21 मार्च 2022 (08:23 IST)
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केल्याचा आरोप निश्चित केलेले सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शनिवारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने ओळखले आहे. अंदरे आणि कळसकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळीबार केला आणि त्यानंतर दोघे तेथून फरार झाले , अशी साक्ष या प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने दिली. सध्या या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष सुरू आहे.
या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या पुणे महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्याची शनिवारी साक्ष झाली.
 
त्यांनी डॉ. दाभोलकरांच्या हत्याऱ्यांना ओळखले आहे. त्यांनी न्यायालयात दिलेली ही साक्ष महत्त्वाची ठरणार आहे. अध्यक्ष शी शयावरील प्रकारची आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या रोप केला रोखण्यासाठी दमीर पुति , आवाहन केले खटल्याची सुनावणी सुरू आहे.
 
या प्रकरणात ‘ सनातन संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे सचिन अंदुरे, शरद कळसकर, ॲड.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप ” निश्चिती करण्यात आली आहे. डॉ. दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी शनिवार पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या करण्यात आली होती. घटनेच्या दिवशी साक्षीदार हे पुलावर साफ महिला सफाई करीत होते. सहकारी त्यावेळी तेथे होती. काम झाल्यानंतर ते पुलाच्या डिव्हाडरवर बसले होते. अशी माहिती समोर आली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मच्छिमारांना सावधानतेचा इशारा