Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लग्नाच्या दिवशी वरातीसह नवरदेव पोलीस ठाण्यात

लग्नाच्या दिवशी वरातीसह नवरदेव पोलीस ठाण्यात
, सोमवार, 16 मे 2022 (15:17 IST)
लग्नाच्या दिवशी वधूने वरातीसह नवरदेव पोलीस ठाण्यात नेण्याची धक्कादायक घटना पिंपरी येथे घडली आहे. वधू  आणि वरपक्षाच्या लग्नाच्या गोष्टी सर्व ठरल्याप्रमाणे करण्याचे योजिले लग्नाची तारीख , मुहूर्त, मान-पान, कार्यालय सर्व काही ठरविण्यात आलं. मात्र एवढे करून देखील लग्नाला वरपक्षाकडील लोक आले नाही. तर मात्र वधू आणि तिच्या कुटूंबियांनी थेट पोलीस ठाण्यात वर आणि वऱ्हाडीला नेलं. हे घडले आहे पुण्यातील पिंपरी येथे. 
 पिंपरीत लग्नाच्या दिवशी लग्नाला नवरदेव आला नाही म्हणून वधूने थेट पोलीस ठाण्यात मुलाची तक्रार केली. त्या नंतर अक्षय प्रदीप कोतवडेकर (वय वर्ष 28), प्रदीप पांडुरंग कोतवडेकर (वय वर्ष 62), आदित्य प्रदीप कोतवडेकर (वयवर्ष  27), वंदना प्रदीप कोतवडेकर (वयवर्ष  56), किरण सुतार (वय वर्ष 52) यांच्याविरोधात पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार, वरपक्षाकडील मंडळी मुलीला पाहायला आली आणि नंतर पसंती झाल्यावर त्यांचा साखरपुडा झाला. 14 मे अशी लग्नाची तारीख ठरली. ठरल्याप्रमाणे मुलीकडीच्या लोकांनी सर्व गोष्टी पूर्ण केल्या. तरीही वरपक्षाकडून त्यांच्या मागण्या सुरूच होत्या. ठरल्या प्रमाणे 14 मे रोजी रामकृष्ण मंगल कार्यालय लग्न करण्याचे ठरले. वधूपक्षाचे मंडळी आणि नातेवाईक कार्यालयात पोहोचले.  मात्र लग्नाच्या दिवशी वरपक्षाकडील कोणीच कार्यालयात आले नाहीत. सम्पुर्ण दिवस वाट बघून देखील नवरदेव किंवा वाहरदी आले नाही हे पाहून वधूने संतापून थेट पोलीस ठाणे गाठले आणि वरपक्षाच्या विरुद्ध तक्रार केली. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाराणसी : ज्ञानवापी मशिदीमध्ये ‘शिवलिंग’सापडल्याच्या दाव्यावर अधिकारी म्हणतात...