स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यावसाय करणा-या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. महिलांना पैशाचे आमिष दाखवून आरोपी त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यावसाय करून घेत होता. पोलिसांनी वाकड आणि बाणेर येथील स्पा सेंटरवर गुरूवारी (दि.10) छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले.
दामाजी ज्ञानेश्वर मुरडे (वय 38, रा. हडपसर, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महिला फिर्यादीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीमनुसार, आरोपी पैश्याचे आमिष दाखवून तीन महिलांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यावसाय करून घेत होता. पोलिसांनी वाकड येखील टच रिलॅक्सो आणि बाणेर येथील मॉन्टॅनियन स्टिल वॉटर या स्पा सेंटरवर छापा टाकून आरोपीला ताब्यात घेतले. तसेच, 29 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश पवार अधिक तपास करीत आहेत.