Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती

पुणे महापालिकेत ‘या’ 203 पदांसाठी भरती, जाणून घ्या सविस्तर माहिती
, सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (08:32 IST)
पुणे महानगरपालिकेत विविध पदासाठी भरती केली जात आहे. पुणे महापालिकेत तब्बल 203 जागांसाठी बंपर भरती होणार आहे.यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.समुपदेशन, समूहसंघटिका,कार्यालय सहाय्यक, व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक, संसाधन व्यक्ती, विरंगुळा केंद्र समन्वयक, सेवा केंद्र समन्वय,सेवा केंद्र मुख्य समन्वयक, स्वच्छात स्वयंसेवक, संगणक संसाधन व्यक्ती या पदासांठी ही भरती केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 20 आणि 21 सप्टेंबर 2021 आहे.
 
या पदांसाठी भरती
 
1. समुपदेशन (Counseling)
 
2. समुहसंघटिका (Group Organizations)
 
3. कार्यालय सहाय्यक (Office Assistant)
 
4. व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक (Business Group Head Guide)
 
5. संसाधन व्यक्ती (Resource Person)
 
6. विरंगुळा केंद्र समन्वयक (Virangula Center Coordinator)
 
7. सेवा केंद्र समन्वय (Service Center Coordinator)
 
8. सेवा केंद्र मुख्य समन्वयक (Service Center Main Coordinator)
 
9. स्वच्छता स्वयंसेवक (Sanitation Volunteer)
 
10. संगणक संसाधन व्यक्ती (Computer Resource Person)
 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
 
समुपदेशन (Counseling) – MSW आणि काउन्सिलिंग डिप्लोमा असणं आवश्यक, तसेच एक वर्षाचा अनुभव
 
समूहसंघटिका (Group Organizations) – MA मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र असणं आवश्यक, एक वर्षाचा अनुभव
 
कार्यालय सहाय्यक (Office Assistant) – बारावी उत्तीर्ण आवश्यक, टायपिंग मराठी आणि इंग्रजी आवश्यक, दोन वर्षाचा अनुभव
 
व्यवसाय गट प्रमुख मार्गदर्शक (Business Group Head Guide) – बी.कॉम किंवा पदवीधर आणि समाज विभागातील पाच वर्षाचा अनुभव
 
संसाधन व्यक्ती (Resource Person) – एम.कॉम. आणि पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागातील दोन वर्षाचा अनुभव
 
विरंगुळा केंद्र समन्वयक (Virangula Center Coordinator) – बारावी उत्तीर्ण आवश्यक. पुणे महानगरपालिका किंवा समाज विभागातील एक वर्षाचा अनुभव
 
सेवा केंद्र समन्वय (Service Center Coordinator) – दहावी उत्तीर्ण आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा किमान अनुभव
 
सेवा केंद्र मुख्य समन्वयक (Service Center Main Coordinator) – सातवी उत्तीर्ण आणि व्यवसाय प्रशिक्षण संस्थेचा अभ्यासक्रम पूर्ण असणं आवश्यक
 
स्वच्छता स्वयंसेवक (Computer Resource Person) – चौथी पास आणि कमाचा एक वर्षाचा अनुभव
संगणक संसाधन व्यक्ती (Sanitation Volunteer) – बारावी उत्तीर्ण आणि कॉम्प्युटर कोर्स आवश्यक
 
अर्ज करण्याचा पत्ता
 
एस.एम. जोशी हॉल, 582 रस्ता पेठ, टिळक आयुर्वेद कॉलेज शेजारी, पुणे 11(या भरतीसाठी अर्जदारांनी स्वत: सर्व कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहणं आवश्यक आहे.)
 
आवश्यक कागदपत्रे
जन्मतारखेचा दाखला,शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, विवाहित असल्यास संबंधित प्रमाणपत्र,ओळखपत्र, टायपिंग उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; दोन जण जखमी