Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’

ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’
, सोमवार, 20 डिसेंबर 2021 (08:24 IST)
फोटो साभार -सोशल मीडिया पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान व सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय ‘पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांना जाहीर करण्यात आला आहे. लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ.भास्करराव खांडगे पुरस्कार लावणी गायिका व नृत्यांगना पुष्पा सातारकर यांना व तमाशा साहित्यिक बापूसाहेब जिंतीकर पुरस्कार गझलकार व शाहीर सुरेशकुमार वैराळकर यांना देण्यात येणार आहे. अशी माहीती प्रतिष्ठानचे संस्थापक जयप्रकाश वाघमारे यांनी दिली.
 
बुधवार दिनांक २२ डिसेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे सायंकाळी ५ वाजता पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केलेला आहे. पुरस्कार वितरण समारंभानिमित्त दुपारी १ ते रात्री ८ वाजेपर्यंत ‘पुणे लावणी महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. शाहीर अमर पुणेकर ,जय अंबिका कला केंद्र सणसवाडी, कविता बंड निर्मित ढोलकीचा खणखणाट घुंगरांचा छनछनाट, आर्यभूषण थिएटर पुणे येथील लोककलावंत आपली कला सादर करणार आहेत. महिलांसाठी बाल्कनी राखीव ठेवण्यात आलेली आहे. लोककलेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी सर्वांना प्रवेश विनामूल्य उपलब्ध करून दिलेला आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखेर 'त्या' वादग्रस्त वक्तव्याबाबत मंत्री गुलाबराव पाटलांनी मागितली माफी