आपल्या इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यांनी मानवी सभ्यतेवर अमिट छाप सोडली आहे. त्यापैकी एक म्हणजे प्रभू श्री रामाच्या जीवनाची कथा. भगवान रामाची कथा काळाच्या कसोटीवर खरी उतरली आहे आणि शतकानुशतके लाखो लोकांच्या श्रद्धेला एक आकार दिला आहे.
मधेच राम हे कल्पनेचे चित्र आहे अशी चर्चा रंगली. ऐतिहासिक शोधकर्त्यांनी अलीकडेच हा गोंधळ देखील दूर केला आहे. आणि भगवान श्रीरामाच्या अस्तित्वाची पुष्टी केली. अनेक इतिहासकारांनी रामायणातील घटनांचा सत्यतेने समर्थन केलं आहे. या मध्ये पृथ्वीवर प्रभू श्रीरामाची उपस्थिती दर्शविणाऱ्या तारखांचा समावेश आहे.
अयोध्या ते श्रीलंका त्यांचा प्रवास, वाटेत लोकांना एकत्र करणे हा देखील या ऐतिहासिक कथेचा भागच आहे.
रामायणाचा प्रभाव फक्त भारतापुरताच नाही तर जगभरात पसरला आहे. बाली, इंडोनेशिया, आणि दक्षिण पूर्व आशियात देखील रामायण प्रचलित आहे. एवढेच नाही तर सुदूर पूर्व भागात जपान मध्ये देखील रामायणाच्या प्राचीन कथेचा प्रभाव दिसून येत आहे. रामाच्या नावाचा नाद जगभरात पसरला आहे. जर्मनी मध्ये रामबाख सारखी ठिकाणे याचे जिवंत उदाहरण आहे.
'राम' म्हणजे 'आत्मप्रकाश' आपल्या हृदयात जो प्रकाश आहे तोच राम आहे, राम आपल्या हृदयात चमकत आहे.प्रभू श्रीरामाचा जन्म आई कौशल्या आणि वडील दशरथ यांच्या पोटी झाला.संस्कृत मध्ये दशरथाचा अर्थ आहे दहा रथ असलेला. इथे दहा रथ म्हणजे आपल्या ज्ञानाच्या पाच इंद्रियांचे आणि पाच कर्मेंद्रियांचे प्रतीक आहे.
कौशल्याचा अर्थ म्हणजे जी कुशल आहे. रामाचा जन्म तिथेच होऊ शकतो जिथे ज्ञानाच्या पाच इंद्रियांचा आणि पाच कर्मेंद्रियांचा संतुलनाची कार्यक्षमता असेल. राम अयोध्यात जन्मले ज्याचा अर्थ आहे ज्या ठिकाणी युद्ध होऊ शकत नाही असे ठिकाण.जेव्हा आपले मन सर्व द्वैतापासून मुक्त असेल तेव्हा आपल्या मनात ज्ञानाचा प्रकाश होतो.
राम हा आपला 'आत्मा' आहे, लक्ष्मण 'चैतन्य' आहे, सीताजी 'मन' आहे आणि रावण 'अहंकार' आणि 'नकारात्मकते'चे प्रतीक आहे.जसा पाण्याचा स्वभाव 'वाहणे' आहे, त्याचप्रमाणे मनाचा स्वभाव डगमगणे आहे. मनाच्या रुपात असलेल्या सीताजीला सोनेरी मृगाचा मोह पडला. आपले मन गोष्टींकडे वळते आणि त्यांच्याकडे आकर्षित होते. अहंकाराच्या रूपात रावणाने मनाच्या रूपात सीताजींना पळवून नेले. अशा प्रकारे सीताजी मनाच्या रूपात रामापासून आत्म्याच्या रूपात दूर झाल्या. त्यानंतर 'पवनपुत्र' हनुमानजींनी श्रीरामजींना सीताजींना परत आणण्यात मदत केली.
म्हणून श्वासोच्छ्वास आणि जागृतीच्या मदतीने मन पुन्हा आत्म्याशी म्हणजेच रामाशी जोडले जाते. अशा प्रकारे संपूर्ण रामायण आपल्यामध्ये दररोज घडत असते.
भगवान श्रीरामाने एक चांगला मुलगा, शिष्य आणि राजांच्या गुणांचे आदर्श उदाहरण मांडले. या गुणांमुळे ते मर्यादा पुरूषोत्तम म्हणवले गेले. एक आदरणीय राजा म्हणून, प्रभू रामाच्या राज्यात असे गुण होते ज्यामुळे त्याचे राज्य विशेष होते. प्रभू रामाने नेहमीच आपल्या लोकांचे हित साधून निर्णय घेतले. महात्मा गांधींनीही रामराज्यासारख्या आदर्श समाजाची कल्पना केली होती, जिथे प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण होतात; सर्वांना न्याय मिळाला पाहिजे; भ्रष्टाचार होता कामा नये आणि गुन्हेगारी खपवून घेतली जाऊ नये.रामराज्य हे गुन्हेगारीमुक्त समाजाचे प्रतिनिधित्व करते.