टोलनाक्यावर यापुढे इलेक्ट्रॉनिक मशीन बसविणार असून हिशेब ठेवणारे धोरण राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले, सरकारचा टोल धोरणास सरसकट विरोध नाही; कारण हे धोरण जगाने स्वीकारलेले आहे. मात्र या धोरणाच्या अंमलबजावणीबाबत दुमत आहे.
आमच्या खिशातून काढून घेतलेला पैसा विकासासाठी न जाता त्यातून दुसराच कुणीतरी श्रीमंत होत आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात जनमानसात चीड आहे. ज्या रस्त्यांचे पैसे सात किंवा नऊ वर्षांत फिटले असते तिथे ३०-३० वर्षे टोल लावले. हे आम्ही यापुढे चालू देणार नाही.