Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वयाने थकलोय, विचारांनी नाही- बाळासाहेब

वयाने थकलोय, विचारांनी नाही- बाळासाहेब

वेबदुनिया

मुंबई , शनिवार, 23 जानेवारी 2010 (18:20 IST)
ND
ND
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज ८३ वर्षे पूर्ण करून ८४ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे बाळासाहेब कुणालाही भेटणार नाहीत. त्यामुळे मातोश्री या त्यांच्या निवासस्थानी गर्दी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. बाळासाहेबांनी 'सामना'तून दिलेल्या संदेशात मी ह्रदयाने तुमच्या जवळच आहे, असे त्यांच्या लाडक्या शिवसैनिकांना म्हटले आहे.

बाळासाहेबांनी या संदेशात गर्दी भरल्या सभांची आठवण काढली असून आता आजारातून उठल्यानंतर ती ताकद राहिली नाही अशी खंत व्यक्त केली आहे. पण वयाने थकलो असलो तरी विचारांनी नाही, असेही स्पष्ट केले आहे.

हॉस्पिटलमधून आल्यानंतर आज कुठलाही त्रास नाही. फक्त श्वास लागतो. म्हणून कधी कधी भेटणे अशक्य होते. औषधोपचार चालूच आहेत, अशी प्रकृतीविषयक माहिती देऊन मातोश्री हे शिवसैनिक व हितचिंतकांचे माहेरच आहे. माहेराला येणार्‍याला बंदी असूच खत नाही. पण आपल्याला भेटण्याची ताकद आता माझ्यात राहिली नाही. आपण मला समजून घ्याल असे आवाहनही बाळासाहेबांनी केलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi