महाडच्या सावित्री नदीमध्ये पुन्हा शोधकार्य सुरु झाले आहे. काल गुरुवारी दुर्घटनेच्या दुस-या दिवशी एकूण १४ मृतदेह सापडले. पण बेपत्ता असलेल्या वाहनांचा अद्यापही शोध लागलेला नाही.
महाड पट्ट्यात आणि समुद्र किना-यांवर गुरुवारी दुर्घटनाग्रस्तांचे मृतदेह सापडला. घटनास्थळापासून कित्येक मैल दूरवर मृतदेह सापडले. नदीच्या जोरदार प्रवाहामुळे इतर बेपत्ता व्यक्तीही कदाचित समुद्रापर्यंत वाहत गेल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. १४ मृतदेहांची ओळख पटली आहे. आज उर्वरित २८ बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येईल. पावसाचा जोर आणि सावित्री नदीची धोकादायक पातळी यामुळे शोधकार्याला अद्याप अपेक्षित यश मिळू शकलेले नाही. एनडीआरएफ, तटरक्षक दल आणि नौदलाचे जवान जोरदार प्रवाहातही मेहनत घेत आहेत.