Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार सोमय्यांचा सरकारवर आरोप

३ कोविड सेंटरमध्ये १०० कोटीचा भ्रष्टाचार सोमय्यांचा सरकारवर  आरोप
मुंबई , गुरूवार, 20 जानेवारी 2022 (08:15 IST)
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जानेवारीच्या सुरुवातीलाच ठाकरे सरकारच्या काळात मोठा कोविड भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. तर पुढील  १० दिवसांत हा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी त्यापुढे  पुण्यात बोलताना सोमय्या यांनी राज्यातील ३ जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठराविक कंपनीला काम देण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
 
उद्धव ठाकरे पीएमआरडीएचे चेअरमन आहेत. त्यांच्यामुळेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना मुख्यमंत्र्यांनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. ९ दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं. उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात ७ कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. ६५ कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारलाय.
 
त्याचबरोबर ज्या कंपनीनं लोकांच्या जीवाशी खेळण्याचं पाप केलं. त्यांच्या विरोधात सगळी कागदपत्रे माझ्याकडे आहेत. १०० कोटी कमावण्यासाठी रस्त्यावरच्या एका माणसाला हे काम दिलं गेलं. यावर फौजदारी कारवाई व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे.- पंकजा मुंडें