Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोंदियात शिवशाही बस उलटून 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी

apghat
, शनिवार, 30 नोव्हेंबर 2024 (15:11 IST)
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनीनजीक शिवशाही बसचा दुर्दैवी अपघात होऊन काही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 
 गोंदिया कोहमारा राज्य महामार्गावरील खजरी गावाजवळ हा अपघात झाला. बाईक वाचवण्याच्या प्रयत्नात प्रवासी बसचा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) शिवशाही बस उलटून अनेक प्रवाशांचा चिरडून मृत्यू झाला.

हा अपघात आज दुपारी 12.00 ते 12.30 च्या दरम्यान घडला. भंडारा येथून साकोली लाखनीमार्गे गोंदियाकडे जाणाऱ्या शिवशाही  समोर अचानक दुचाकी आली. दुचाकीस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना चालकाने पलटी घेतल्याने भरधाव वेगात असलेली बस पलटी झाली.

अपघाताच्या वेळी बसमध्ये 35 हून अधिक प्रवासी होते. 11 प्रवाशांचा मृत्यू, तर 23 जखमी झाले आहे. अपघातानंतर बसच्या चालकाने तिथून पळ काढला. काही लोकांने पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी हजार झाले. त्यांनी जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून शिवशाही बस उचलण्यासाठी क्रेनची मदत घेतली. पोलीस चालकाचा शोध घेत असून पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आम्हाला गृहमंत्रालय मिळावे', शिवसेनेने आपली मागणी मांडली