Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या घरातून 40 जिवंत काडतूस, 1 तलवार जप्त

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांच्या घरातून 40 जिवंत काडतूस, 1 तलवार जप्त
, शनिवार, 3 ऑगस्ट 2024 (17:33 IST)
चंद्रपुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्याच्या घरातून पोलिसांनी जिवंत काडतूस आणि तलवार जप्त करण्यात आली आहे. पोलिसांना गुप्त हेरकर कडून ही माहिती मिळाली असून पोलिसांनी सापळा रचून या प्रकरणी कारवाई करत युवासेनेच्या जिल्हाधिकाऱ्यांसह तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलीस सर्वांची चौकशी करत आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी शहर पोलिसांना चंद्रपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे ने जिवंत काडतुसे आणण्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी रेल्वे स्थानकात सापळा  रचून दोन आरोपींना अटक केली. हे दोघे शुक्रवारी रात्री रेल्वे ने चंद्रपूरला आले होते.

यांना घेण्यासाठी जिल्हाप्रमुख आपल्या वाहनाने आले होते. ते त्यांना घेऊन घरी गेले. पोलिसांना त्यांच्या वाहनाची लोकेशन मिळाल्यावर पोलिसांनी त्यांच्या पाठलाग करत त्यांच्या घरी पोहोचले. पोलिसांना घरात येण्यास रोखण्यात आले. नंतर पोलीस अधीक्षकांसह स्थानिक गुन्हे शाखा आणि रामनगर पोलिसांनी घराची झडती घेतली त्यात त्यांना 40 जिवंत काडतुसे 1 मॅगझीन आणि एक तलवार सापडली. 

त्यांच्या वाहनाची झडती घेतल्यावर पोलिसांना त्यांच्या वाहनातून धातूची वाघनखे आणि बेसबॉल बॅट सापडली.पोलीस एवढी मोठी खेप सापडल्यावर तपासात व्यस्त आहे. या मागील मुख्य सूत्रधार कोण आहे पोलीस याचा शोध येत आहे.  या घटनेमुळे चंद्रपुरात खळबळ उडाली आहे. 
Edited by - Priya Dixit   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नाशिकात किरकोळ वादांनंतर लोखण्डी रॉड ने तरुणाला बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू