Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गणेशोत्सवासाठी यंदा मध्य रेल्वेकडून 74 विशेष गाड्या

indian railway
, सोमवार, 4 जुलै 2022 (21:12 IST)
गणेशोत्सवासाठी मध्य रेल्वेने 74 विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणात कोकणवासिय हे कोकणात जात असतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होता. त्यामुळे दरवर्षी मध्य रेल्वेकडून विशेष गाड्या पुरवल्या जातात.
 
1. मुंबई - सावंतवाडी दैनिक विशेष (44 सेवा)
 
01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि. २१.८.२०२२ ते ११.९.२०२२ पर्यंत दररोज ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.०० (दुपारी २) वाजता पोहोचेल.
01138 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून दि. २१.८.२०२२ ते ११.९.२०२२ पर्यंत दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
 
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
 
किती कोणते डबे : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.
 
२. नागपूर - मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा)
 
01139 विशेष नागपूर येथून दि. २४.८.२०२२ ते १०.९.२०२२ या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
 
01140 विशेष मडगाव येथून दि. २५.८.२०२२ ते ११.९.२०२२ या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
 
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर  रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.  
 
डबे: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
 
३. पुणे - कुडाळ विशेष (६ सेवा)
 
01141 विशेष पुणे येथून दि. २३.८.२०२२, ३०.८.२०२२ आणि ६.९.२०२२ रोजी ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
01142 विशेष कुडाळ येथून दि. २३.८.२०२२, ३०.८.२०२२ आणि ६.९.२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.
 
थांबे: लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
 
संरचना: १५ तृतीय वातानुकूलित, ३ शयनयान,
 
४. पुणे - थिवि/कुडाळ - पुणे विशेष (६ सेवा)
 
01145 विशेष पुणे येथून दि. २६.८.२०२२, २.९.२०२२ आणि ९.९.२०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता  पोहोचेल.
01146 विशेष कुडाळ येथून दि. २८.८.२०२१, ४.९.२०२२ आणि ११.९.२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
 
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड (फक्त 01145 साठी), थिवि (फक्त 01145 साठी).  
 
डबे : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
 
५. पनवेल - कुडाळ/थिवि - पनवेल विशेष (६ सेवा)
 
01143 विशेष ट्रेन पनवेल येथून दि. २८.८.२०२२, ४.९.२०२२ आणि ११.९.२०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता  पोहोचेल.
01144 विशेष ट्रेन थिविम येथून दि. २७.८.२०२२, ३.९.२०२२ आणि १०.९.२०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
 
थांबे: रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ (फक्त 01144 साठी), सावंतवाडी रोड (फक्त 01144 साठी)
 
संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
 
आरक्षण: सर्व गणेशोत्सव  विशेषसाठी बुकिंग दि. ४.७.१०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल.
 
या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. गरजेनुसार आणखी काही गणपती स्पेशल ट्रेन्स येणाऱ्या दिवसांत जाहीर केल्या जातील.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ३ मोठ्या घोषणा