Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शीतल तेजवानीला पुणे न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली

शीतल तेजवानीला पुणे न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली
, शुक्रवार, 5 डिसेंबर 2025 (11:13 IST)
पुण्यातील मुंढवा येथील सुमारे ४० एकर सरकारी जमिनीच्या कथित गैरव्यवहाराप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शीतल तेजवानीला पुणे न्यायालयाने ११ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील मुंढवा येथील कोट्यवधींच्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणात मुख्य आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी ४ डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन ११ डिसेंबर २०२५ पर्यंत चालेल. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने बुधवारी तिला अटक केली होती आणि गुरुवारी तिला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले. पोलिसांनी १४ दिवसांची कोठडी मागितली असली तरी न्यायालयाने ८ दिवस मंजूर केले.
 
 मुंढवा येथील सरकारी जमिनीचा गैरव्यवहार आणि तिची बेकायदेशीर विक्री केल्याचा आरोप आहे. शीतल तेजवानीवर शासनाच्या मालकीची सुमारे ४० एकर जमीन स्वतःच्या फायद्यासाठी विकल्याचा आरोप आहे. तिने वतनदारांकडून 'कुल मुखत्यारपत्र' घेऊन ही जमीन 'अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी'या कंपनीला विकली, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार हे भागीदार आहे.
या गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असून, यात सामील असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी, आर्थिक व्यवहारांचे  धागेदोरे शोधण्यासाठी आणि डिजिटल उपकरणे जप्त करण्यासाठी पोलिसांनी विस्तृत पोलीस कोठडीची मागणी केली होती.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला आणि ११ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणात पुढील तपासासाठी पोलीस आता शीतल तेजवानीची चौकशी करतील.
Edited By- Dhanashri Naik

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

LIVE: नगरपंचायत निवडणुकीत १७ ईव्हीएमचे सील तोडून पुन्हा मतदान झाल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला