Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकमध्ये बेशिस्त पद्धतीने वाहन चालवल्यामुळे नऊ महिन्यात 90 जणांचा मृत्यू

death
, गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (21:06 IST)
नाशिक : नाशिक शहरामध्ये नियमांचे पालन न करता बेशिस्त पद्धतीने वाहन चालविण्यामुळे गेल्या नऊ महिन्यात 340 दुचाकी चालकांचा अपघात झाला असून त्यामध्ये 90 नागरिकांना प्राण गमवावे लागल्याची माहिती पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक समितीच्या बैठकीमध्ये देण्यात आली.
 
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, यांनी पोलीस उपआयुक्त वाहतूक चंद्रकांत खांडवी व सहा.पोलीस आयुक्त, वाहतूक डॉ. सचिन बारी यांच्या उपस्थितीत  झालेल्या बैठकीत दुचाकी  अपघातांच्या वाहतुक विभागातर्फे आढवा घेतला असता, जानेवारी २०२३ ते १० सप्टेंबर २०२३ पर्यंत नाशिक शहरात एकुण ३४० अपघात झाले असुन त्यापैकी २६७ दुचाकी वाहन चालकांचा अपघात झाल्याचे निष्पन्न झाले असुन त्यामध्ये ९० दुचाकीस्वार मयत झाले व २०६ दुचाकीस्वार जखमी झालेले आहे.
 
दरम्यान या अपघातांमध्ये दुचाकी भरधाव वेगात चालविणे, हेल्मेट परिधान न करणे, धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, सिग्नलचे उल्लंघन, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, चुकिचे पध्दतीने ओव्हरटेक करणे इ. कारणांमुळे अपघात झाल्याचे निष्पन्न झाल्याचे तपासाअंती दिसुन आले आहे.
 
त्याकरीता शहर वाहतूक शाखा, नाशिक शहर युनिट क. १ ते ४ यांच्या तर्फे दुचाकी चालकांचे प्रबोधन व समुपदेशन शहरातील चौका चौकांमध्ये केले जाते. त्यामध्ये भरधाव वेगात चालविणे, हेल्मेट परिधान नकरणे,  धोकादायक पध्दतीने वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, विरुध्द दिशेने वाहन चालविणे, सिग्नलचे उल्लंघन, वाहन चालवितांना मोबाईलवर बोलणे, चुकिचे पध्दतीने ओव्हरटेक करणे इ. कारणांमुळे अपघात होवुन त्यात वाहन चालक मयत अथवा जखमी होतात, त्याकरीता दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेट परिधान करणे  सक्तीचे आहे.
 
वाहन चालकांनी वरील सर्व नियम पाळल्यास नाशिक शहरात अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल बाबत त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले जाते. व नाशिक शहरात अपघात कमी होण्यासाठी शहर वाहतूक शाखा युनिट क्र. १ ते ४ यांचे मार्फतीने विवीध शाळा, कॉलेजेस, कंपनी, शासकिय कार्यालये येथे समक्ष जावुन नागरीकांचे वाहतूकी संदर्भात प्रबोधन केले जाते. दुचाकी वाहन चालकांनी वरील सर्व नियमांचे तंतोतंत पालन  केल्यास नाशिक शहरातील दुचाकी वाहन चालकांचे अपघात कमी होण्यास मदत होईल.त्यामुळे दुचाकी चालकांनी नियमांचे पालन करावे असे आव्हान देखील पोलीस आयुक्तालयाच्या वतीने या बैठकीत करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

12 मुलांच्या आईला तिसरे लग्न करायचे आहे, 10 मुलांचा बाप शोधत आहे, हे कारण दिले