सांगलीच्या कुपवाड येथे बामणोलीतील एका खाजगी महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून एक विद्यार्थिनीने पालकांसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिने असे का केले हे अद्याप कळू शकले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यावर नेहमीप्रमाणे या मुलीने शाळेतून सुट्टी झाल्यावर बॅग शाळेतील व्हॅन मध्ये ठेवली. तिचे आई वडील शाळेत आलेले होते हे पाहून ती थेट शाळेच्या गेट मधून आत गेली आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन तिथून उडी घेतली. खाली पडल्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती.ती गंभीर जखमी झाली. तिला पालकांनी आणि शाळा प्रशासनाने जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शाळेत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेत मुलीने आत्महत्या का केली याचा तपास सुरु केला आहे.