Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मरकटवाडीनंतर आणखी एका गावात ईव्हीएमवर बहिष्कार

मरकटवाडीनंतर आणखी एका गावात ईव्हीएमवर बहिष्कार
, मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (17:29 IST)
महाराष्ट्रात ईव्हीएमचे वाद अद्याप सुरूच आहे. माळशिसर विधानसभा मतदार संघातील मरकटवाडी गावात ईव्हीएम वर संशय आल्याने  बॅलेट पेपरद्वारे मॉक पोल घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता आणखी एका गावात ईव्हीएमबाबत मोठी कारवाई करण्यात आली आहे. ग्रामसभेने विरोधात ठराव करून प्रशासनाची कोंडी केली आहे.
 
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कोळेवाडी ग्रामसभेने भविष्यातील निवडणुका बॅलेट पेपरद्वारे घेण्याचा ठराव मंजूर केला आहे. ईव्हीएमविरोधात ठराव करणारे कोळेवाडी हे महाराष्ट्रातील दुसरे गाव ठरले आहे. कोळेवाडी हे गाव कराड (दक्षिण) विधानसभा मतदारसंघात येते, ज्याचे पूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केले होते. 

नोव्हेंबर मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपचे उमेदवार अतुल भोसले यांच्याकडून पराभव झाला. कोळेवाडीतील जनतेने ईव्हीएम द्वारे झालेल्या मतदानावर शंका व्यक्त केल्यानंतर हा ठराव मंजूर करण्यात आला आहे. 
Edited By - Priya Dixit

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Year Ender 2024: यावर्षी या 5 व्हिडिओंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली, तुम्ही बघितले का?