Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यात जनता दरबार घेण्याचे अजित पवार यांचे आदेश, या दिवशी भरणार दरबार

ajit pawar
, शनिवार, 11 जानेवारी 2025 (14:44 IST)
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी राजकीय नेते पुन्हा आपले काम दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना कडक सूचना दिल्या आहे. 

अजित पवार यांनी आपल्या नेत्यांना नियमितपणे लोकांच्या समस्या ऐकून त्यावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी जनता दरबार घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या मंत्र्यांना दर मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी जनता दरबार आयोजित करून सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे.

हा जनता दरबार राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केला जाणार आहे. कोणता दिवशी कोणता दरबार हे देखील ठरवण्यात आले आहे. आता दर मंगळवारी कॅबिनेट मंत्री हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील यांचा जनता दरबार भरणार आहे. 

बुधवारी माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, आदिती तटकरे जनता दरबाराचे आयोजन करणार आहेत. अजित पवार यांनी यापूर्वी बारामतीत जनता दरबार भरवला आहे. या जनता दरबाराच्या माध्यमातून पक्षाचे नेते जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याचवेळी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्याचे काम पक्षाचे हे सर्व मंत्री करतील. नेहमीप्रमाणे या वेळीही अजित पवार त्यांचा मतदारसंघ बारामतीत जनता दरबार घेणार आहेत.

आज शनिवारी  सकाळी अजित पवार स्वतः बारामती मतदार संघात पोहोचले आणि त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला. त्यांनी एमआयडीसी, वसतिगृह, बारामती तालुका पोलीस ठाणे आणि रस्तेबांधणीच्या कामांचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.आणि चांगल्या दर्जाचे काम करण्याचा सूचना दिल्या. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

हुश मनी प्रकरणात न्यायालयाने ट्रम्प यांची बिनशर्त निर्दोष मुक्तता केली