Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Alibagh : शेत तळ्यावर वीज कोसळून पिता पुत्राचा दुर्देवी मृत्यू

Alibagh : शेत तळ्यावर वीज कोसळून पिता पुत्राचा दुर्देवी मृत्यू
, रविवार, 1 ऑक्टोबर 2023 (17:05 IST)
Alibagh :सध्या परतीच्या पावसाने सर्वत्र झोडपले आहे. वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह  पावसाचा जोर सुरु आहे. राज्यात अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती उद्भवत आहे. अलिबाग तालुक्यात दिवलांग गावात रविवारी संध्याकाळ पाऊस वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु होता. विजांच्या कडकडाटासह पावसाने जोर धरला होता. दिवलांग गावात शेततळ्यावर वीज कोसळून पिता पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
 
अलिबाग तालुक्यात दिवलांग गावात रघुनाथ म्हात्रे आणि त्यांचा मुलगा हृषीकेश म्हात्रे शेत तळ्यावर गेले असता त्या दोघांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यात ते गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळतातच स्थानिक आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना तातडीनं रुग्णालयात नेले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. अलिबाग तहसीलदारांनी म्हात्रे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. 

मृतांचे मृतदेह शवविच्छेदन केल्यावर मृतदेह कुटुंबियांना देण्यात आले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. 
 
Edited by - Priya Dixit
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

WhatsApp Status : व्हॉट्सअॅप स्टेटस आता 24 तासांऐवजी 2 आठवडे ठेवता येणार