Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंबाबाईचा उत्तरायणातील किरणोत्सव आजपासून

अंबाबाईचा उत्तरायणातील किरणोत्सव आजपासून
, बुधवार, 30 जानेवारी 2019 (09:58 IST)
करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा उत्तरायणातील किरणोत्सव बुधवार, 30 जानेवारी ते 3 फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. किरणोत्सव मार्गातील अडथळे नोव्हेंबरमध्ये काढल्याने त्यावेळी पूर्ण क्षमतेने किरणोत्सव झाला होता. सध्या ढगाळ वातावरण, थंडी आणि धुके असल्याने किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल की नाही, याबाबत साशंकता आहे.
 
श्री अंबाबाईचा दरवर्षी नोव्हेंबर तसेच जानेवारी-फेब्रुवारीमध्ये असा दोनदा किरणोत्सव होतो. गेली काही वर्षे हा किरणोत्सव सोहळा तीन दिवस असायचा. मात्र त्याआधी व नंतरच्या दिवशीही सूर्यकिरणे देवीच्या मूर्तीवर पडायची. त्यामुळे पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने किरणोत्सव पाच दिवसांचा होत असल्याचे जाहीर केले आहे. पुढील दोन दिवसांत हे वातावरण बदलले, तर देवीचा किरणोत्सव पूर्ण क्षमतेने होईल, असे अभ्यासकांचे मत आहे. या काळात तीन दिवस भाविकांना एक तासासाठी मंदिरात प्रवेश बंदी केली जाणार आहे. भाविकांची सोय व्हावी, यासाठी मंदिरात देवस्थान समिती कार्यालयाशेजारी व नगारखान्याच्या पुढे अशा दोन ठिकाणी एलईडी स्क्रीन लावून भाविकांना किरणोत्सव लाईव्ह पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तयारी परीक्षेची : १० वी चे ऑनलाईन प्रवेशपत्र वाटप सुरु