Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘अ‍ॅम्बुलन्स’चा सायरन आता १२० डेसिबल

‘अ‍ॅम्बुलन्स’चा सायरन आता १२० डेसिबल
, गुरूवार, 6 जुलै 2017 (09:06 IST)
रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णांना वेळेत उपयुक्त असलेल्या अ‍ॅम्बुलन्सचा सायरन आता १२० डेसिबलपर्यंत वाजणार आहे. अ‍ॅम्बुलन्सना निर्माण होणारा अडथळा दूर करण्यासाठी ट्रॅफिकमधून मार्ग काढताना होणारा त्रास यामुळे थोडा कमी होणार आहे. अ‍ॅम्बुलन्सचा सायरन ११० ते १२० डेसिबलपर्यंत वाढविण्याची अधिसूचना राज्यसरकारने काढली आहे. 
 
 राज्यभरात फिरणाNया अ‍ॅम्बुलन्सना  यापूर्वी ६५ ते ७५ डेसिबलपर्यंतच्या सायरनचा वापर करण्यास परवानगी होती. मात्र हा आवाज ट्रॅफिकमधील वाहनांच्या आवाजामुळे सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलिसांपर्यंत पोहोचणे कठीण होते. 
 
सरकारने ११० ते १२० डेसिबल पर्यंत सायरनची मर्यादा वाढविण्यात आली असल्याने. अ‍ॅम्बुलन्स कोणत्याही लेनमध्ये असो आणि सिग्नलपासून कितीही लांब अंतरावर असो तिचा आवाज सिग्नलवर उभ्या असलेल्या ट्रॅफिक पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णलयात पोहोचणे शक्य होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

व्हॉट्सअॅपकडून नवे नाईट मोड फीचर