Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर मागणी मागे घेत माफीनामा सादर, जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची केली होती मागणी

अखेर मागणी मागे घेत माफीनामा सादर, जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची केली होती मागणी
, गुरूवार, 4 मार्च 2021 (08:22 IST)
नांदेडमधील सहायक लेखाधिकारी (रोहयो) सतीश पंजाबराव देशमुख यांनी अखेर, जिल्हाधिकारी कार्यालायाच्या आवारात घोडा बांधण्याची आपली मागणी मागे घेत, माफीनामा सादर केला आहे. घोडा खरेदीची व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बांधण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करणारे एक पत्र सतीश देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले होते. त्यात पाठीच्या दुखण्यामुळे वेळेत कार्यालयात येण्यासाठी घोडा खरेदीची व त्याला बांधण्याची परवानगी मागितली होती.
 
यानंतर हे पत्र समाज माध्यमावर तुफान व्हायरल झाल्यानंतर त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारची विनंती करणाऱ्या पत्राबाबतच्या वृत्ताला निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी देखील दुजोरा दिला. तर, सतीश देशमुख यांच्या मागणीवर वैद्यकीय अधिष्ठातांचा अभिप्राय मागवला गेला. अस्थिव्यंग विभागाने पाठीच्या कण्याच्या दुखण्यावर दुचाकीऐवजी घोड्यावर बसून कार्यालयात येणे, हा उपाय संयुक्तिक नसल्याचा अभिप्राय दिला. तो अधिष्ठातांनी जिल्हा प्रशासनाकडे पाठवला.यानंतर या सतीश देशमुख यांनी त्यांची मागणी मागे घेत माफीनामा सादर केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पुणे आणि सूरतशी जोडले जाईल इंदौर, दोन एयरलाईन्सने सहमती