सकाळी बँकेचे व्यवहार सुरु झाले. त्यानंतर बँकेत आलेल्या चार ते पाच जणांनी, बँकेच्या सगळ्या कॉऊंटरवरील कर्मचाऱ्यांना माहिती विचारण्याच्या निमित्ताने बोलण्यात गुंतवून ठेवलं. नंतर कॅशियरचेही लक्ष विचलित केलं. त्यावेळी काऊंटरच्या आत गेलेल्या एकाने केबिनमधील ड्रॉव्हरमधून बारा लाखाची रोकड उचलली आणि पोबारा केला. अडीच तासांनंतर बारा लाख रुपये चोरट्यांनी लांबवल्याचं लक्षात आलं. त्यानंतर या संदर्भात पोलिसांना माहिती देण्यात आली.