Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन : ‘टिकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध!

महाराष्ट्र सायबरचे नागरिकांना आवाहन : ‘टिकटॉक प्रो’ फेक लिंक पासून सावध!
मुंबई , मंगळवार, 7 जुलै 2020 (19:49 IST)
टीकटॉकवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व समाजकंटकांकडून एक फेक टीकटॉक प्रो लिंक बनविली आहे. त्यापासून सावधानता बाळगावी, असे आवाहन महाराष्ट्र सायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी केले आहे.
 
सध्याच्या काळात भारत सरकारने टीकटॉक सहित अन्य ५८ ॲपवर बंदी घातली आहे. परंतु चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी समाजकंटकांकडून उपरोक्त फेक लिंक बनवली असून त्याचा प्रसार व्हाट्सॲप मेसेजेस व एसएमएसवर केला जातो. तुमची सर्व माहिती सायबर भामट्यांकडे जाते. त्या मेसेजचा एक प्रकार खालीलप्रमाणे आहे.
 
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते की, तुम्ही अशा कोणत्याही मेसेजच्या लिंक वर क्लिक करु नये. तसेच हे लक्षात ठेवा की, अशा लिंक्समध्ये मलवार असू शकतो. त्यामुळे यापासून सावध असावे. तसेच केंद्र व राज्य सरकार वेळोवेळी जे नियम व आदेश प्रसिद्ध करतील त्याचे पालन करा व गरज नसल्यास कृपया घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन महाराष्ट्र सायबरमार्फत करण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाचा, ‘रेमडेसिवीर’चे उत्पादन देशात कसे होणार