पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या बैठकीत नारळाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यात नारळाची किमान आधारभूत किंमत (MSP) ५५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहिती दिली.
नारळाची किमान आधारभूत किंमत वाढवण्यात आली आहे. नारळाच्या MSP मध्ये प्रतिक्विंटल ३७५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ९ हजार ९६० रुपये होती. ती वाढून आता १० हजार ३३५ रुपये इतकी झाली आहे, अशी माहिती प्रकाश जावडेकर यांनी दिली.
किमान आधारभूत किंमत वाढवण्यासाठी स्वामीनाथन आयोग लागू करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या या निर्णयामुळे गेल्या ४० वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी पूर्ण झाली आहे, असेही जावडेकर यांनी नमूद केले.