Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बृहन्मुंबई 750 रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी

BMC
, मंगळवार, 30 जानेवारी 2024 (09:49 IST)
मुंबई पालिकेत अगोदरच अभियंत्यांची रिक्त पदे असताना मराठा आरक्षणाचे सर्व्हेक्षण कामासाठी अभियंत्याची नेमणूक करण्यात आल्याने कामगार संघटनांनी या गोष्टीला कडाडून विरोध दर्शविला आहे. आता बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनने पालिकेत कनिष्ठ अभियंता यांची 400 पदे, तर दुय्यम अभियंता यांची 350 पदे अशी एकूण 750 रिक्त असलेली पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली आहे. महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्याकडे युनियनतर्फे सोमवारी एक लिखित निवेदन देण्यात आले आहे, अशी माहिती बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनतर्फे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सर चिटणीस यशवंत धुरी यांनी दिली आहे.
 
राज्य शासनाच्या आदेशाने मुंबईत सध्या “मराठा” आरक्षणासाठी सर्व्हेक्षण करण्याच्या कामासाठी पालिकेतील सर्वच खात्यातीला अभियंत्यांना जुंपण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईत सध्या सुरू असलेल्या काही विकास कामांवर, अभियांत्रिकी कामांवर विपरित परिणाम झाला आहे. अनेक कामे रखडली आहेत.

त्यामुळे कामकाजावर येणाऱ्या खर्चातही वाढ होत आहे. परिणामी संबंधित विकास कामे, प्रकल्प यांच्या मूळ खर्चात वाढ होत आहे. त्यांचा मोठा आर्थिक फटका महापालिकेच्या तिजोरीला बसत आहे. त्यामुळे महापालिकेने विविध खात्यातील कनिष्ठ व दुय्यम अभियंता यांची तब्बल 750 रिक्त पदे लवकरात लवकर भरावीत, अशी मागणी बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनतर्फे कार्याध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष आणि सर चिटणीस यशवंत धुरी यांनी केली आहे.
 
Edited By -  Ratnadeep ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

संबंधित कर्मचारी या ठिकाणी दिसला नाही पाहिजे. जर दिसला तर तुम्ही दिसणार नाही-अजित पवार